बार्डोली सत्याग्रह
गुजरातमधील बार्डोली तालुक्यातील (१३७ गावे, लोकसंख्या ८७ हजार) शेतकऱ्यांनी इ. स. १९२८ मध्ये या सत्याग्रहात प्रारंभ केला. त्यांचे नेते कुंवरजी मेहता व कल्याणजी मेहता हे होते.
या सत्याग्रहाचे नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केले. १२ फेब्रुवारी १९२८ सरदार पटेल बार्डोलीस पोहचले.
गुजरातमध्ये स्थित बार्डोली मध्ये शेतकऱ्यांवर ३०% कर वाढवण्यात आले . यांच्याविरोधात वल्लभभाई पटेलने सत्याग्रह केला.
ब्रिटिश सरकारने विवश होऊन एक न्यायिक अधिकारी ब्रूम फिल्ड व राजस्व अधिकारी मॅक्सवेल च्या अंतर्गत एका आयोगाचे गठन केले.
या आयोगाने ३०% वाढवलेले कर ला अवैध घोषित केले. व त्याला ६.३% केले. या सत्याग्रहामध्येच आंदोलन सफल झाल्यामुळे तेथील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ हि उपाधी दिली.