MahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

उच्च शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता महा DBT पोर्टलवरून दि. १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. उच्च शिक्षण विभागाकडून १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात.

दरम्यान मात्र, २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज केले आहेत, मात्र काही त्रुटीअभावी विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर हे अर्ज परत पाठवले आहेत, अशांना १५ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांनाही अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे.

यापुढे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिले जाणार नसल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. अजिता शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी भरलेले शिष्यवृत्ती अर्ज संस्था अथवा विभागस्तरावर दररोज निकाली काढणे आवश्‍यक आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज प्रलंबित ठेवू नयेत.

प्रलंबित राहिलेल्या अर्जासोबत भविष्यामध्ये उद्‌भवणाऱ्या बाबीस संस्थेचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी

  • mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
  • पोर्टलवर लॉग इन व्हा.
  • तुमचे प्रोफाईल तयार करा.
  • ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

पुन्हा अर्ज करणाऱ्यांसाठी…

  • लॉग इन करा.
  • त्रुटी असलेला अर्ज दिसेल.
  • त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा एकदा सबमिट करा.
Leave a comment