विविध कौशल्य शिका ऑनलाईन

वेब डिझायनर

हा अलिकडच्या काळात विस्तारलेला अभ्यासक्रम मानला जातो. यासाठी कॉलेजला किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटला जाण्याची गरज भासत नाही.

वेब डिझायनचा कोर्स टप्प्याटप्प्याने शिकवला जातो अणि आपणही नियमितपणे त्याचे अवलोकन केल्यास कुशल वेब डिझायनर म्हणून ओळख निर्माण करू शकतो. हा व्यवसाय आपल्यासाठी पार्टटाईम जॉब देखील ठरू शकतो.

परकीय भाषा

एकापेक्षा अधिक भाषा येणे ही आजच्या काळात गरज बनली आहे. केवळ मातृभाषा अणि इंग्रजी भाषा येणे यावरच आजचे करियर अवलंबून राहिलेले नाही. जर अन्य देशाची, प्रदेशाची भाषा अवगत असेल तर करियरला बुस्ट मिळतो.

जर्मन, फ्रेंच, जपानी यासारखी भाषा शिकण्यासाठी विद्यापीठात आणि महाविद्यालयात नियमित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सध्या ऑनलाइनवर विविध परकी भाषा शिकण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध आहेत. याचा तुम्ही फायदा घेऊ शकता.

वाद्यांचे शिक्षण

ऑनलाईनमुळे घरबसल्या नवीन कला शिकण्याचे माध्यम उपलब्ध झाले आहे. यूट्यूब, विमीओ आणि व्हिडिओजग यासारखे काही संकेतस्थळ नवीन वाद्यांची माहिती देताना दिसतात.

व्हिडिओवर नवीन वाद्यांबाबत ऑनलाइनवर टिप्स मिळतात. त्यामुळे आपल्या सवडीनुसार आणि वेळेनुसार ही वाद्य आपण सहज शिकू शकतो. त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही.

कुकिंग

आजकाल टिव्ही, ऑनलाईन आणि पुस्तकाच्या माध्यमातून कुकिंग क्षेत्राचा व्यापक विस्तार झाला आहे. मान्यवर शेफ आणि डायटिशियनच्या ब्लॉग पोस्टद्वारे नवनवीन इंत्यभूत माहिती आपल्याला मिळते.

जगातील कोणत्याही भागाची रेसिपी आपल्याला घरबसल्या शिकायला मिळते. विविध कुकिंग शो आणि ऑनलाईन मार्गदर्शन करणारे शेफ यामुळे आपल्या हाताला चव येऊ शकते.

फोटोग्राफी

आता मोबाईलक्रांतीमुळे चोवीस तास कॅमेरा आपल्या हातात असल्याने फोटोग्राफीचे क्षेत्र अधिकच विस्तारले आहे. परंतु आपल्याला फोटो काढण्याचे कौशल्य अजूनही अवगत झाले नसेल तर इंटरनेट आपल्या साथीला आहे.

बिगिनरपासून ते प्रोफेशनल्स पातळीपर्यंत फोटोग्राफीचे प्रशिक्षण ऑनलाईनवर उपलब्ध आहे. फोटोग्राफीच्या तंत्रातही व्यापक बदल झाल्याने डिजिटल तंत्राने फोटोत अधिक अचुकता आणि सुबकता आली आहे. यासंबंधीचे ज्ञान ऑनलाइनवर उपलब्ध आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*