अनेकांनी मला श्रद्धांजली वाहिली -अलका कुबल

मुंबई- आई माझी काळुबाई या मालिकेचं शुट सुरु असताना जेष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचं साता-यात निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यानंतर सगळ्यंच्या लाडक्या अभिनेत्री अलका कुबल यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची अफवा पसरवली जात होती. मात्र त्यांनी व्हिडीओ शेअर करत खुलासा केला.
मला कोरोनाची बाधा झालेली नाहीयाच सेटवरील २२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्या २२ जणांमध्ये माझा देखील समावेश आहे. असं सगळ्यांना वाटलं. सोशल मीडियावर मला श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. मात्र मी स्पष्ट सांगते.. चाहत्यांनो मी ठणठणीत आहे. मला कोरोनाची बाधा झालेली नाही.

आशालताजी आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाहीसेटवरील सगळे आता बरे झाले आहेत, असं त्यांनी व्हिडीओमार्फत सगळ्यांना सांगितलं. माझ्या आई प्रमाणे असलेल्या आशा ताईंचं दुदेर्वी निधन झालं. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला मात्र त्यांचं वयसुद्धा जास्त होतं. त्यांना या आजारपणात आम्ही बरीच साथ दिली त्यांना मात्र त्या आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्जदरम्यान, प्रेक्षकांनी माझ्यावर माझ्या कामावर प्रचंड प्रेम केलं, जीव लावला. त्याच प्रेक्षकांना मी सांगते की मी ठण ठणीत आहे. तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे, असंही त्या म्हणाल्या.
आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.आशाताई शिंदे यांना कोरोनाची लागण

You might also like
Leave a comment