अबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज
मुंबई, 24 सप्टेंबर : ड्रग्ज प्रकरणात (drugs) आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) च्या जाळ्यात अनेक सेलिब्रिटी अडकत आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येतात एनसीबीने हा फास आता अधिकच आवळला आहे. काही बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. तर आता टीव्ही कलाकारांचीही नावं यात समोर येत आहेत. टीव्ही अभिनेत्री अबिगेल पांडे आणि अभिनेता सनम जौहर यांच्या घरी ड्रग्ज सापडले आहेत.
एनसीबीने अबिगेल पांडे आणि सनम जौहर यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरातून मारियुआना ड्रग सापडला आहे. या दोघांचीही नावं एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशीत समोर आली. आज या दोघांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
दरम्यान आज फॅशन डिझायनर सिमोन खंबाटाची चौकशी होते आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही समन्स बजावण्यात आला आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. दीपिका चौकशीसाठी गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. आता ती गोवा विमानतळावर आहे. चार्टर्ड प्लेनने ती मुंबईत येणार आहे. दीपिका आणि रकुल प्रीत सिंह यांची उद्या चौकशी होणार आहे.