अभिनेते भुपेश कुमार पांड्या यांचे कॅन्सरने निधन

मुंबई (प्रतिनिधी) : ‘विकी डोनर’ आणि ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’फेम अभिनेते भुपेश कुमार पांड्या यांचे बुधवारी कॅन्सरने निधन झाले. ते कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये होते. अहमदाबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घकाळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भुपेश कुमार पांड्या यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. ‘विख्यात रंगभूमी कलाकार भुपेश कुमार पांड्या (माजी विद्यार्थी एनएसडी २००१ बॅच ) यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अतिशय दु:खद आहे. एनएसडी परिवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे ट्विट एनएसडीने केले आहे.भुपेश यांना फुफ्फुसाच्या कॅन्सरने गाठले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोबत ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. जवळची सर्व बचत उपचारांवर खर्च झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. अशात बॉलिवूडचे काही कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*