अभिनेत्री आशालता यांच्या निधनाने अष्टपैलू, गुणी कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. 22 : मराठी  चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांच्या निधनाने अष्टपैलू आणि गुणी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री.देशमुख आपल्या आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशालता वाबगांवकर यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.

तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.  मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.

आशालता वाबगावकर यांनी आपल्या सोज्वळ आणि सहज अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविला होता. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.

लस हाच एकमेव उपाय नाही-पंकज आर पटेल

You might also like
Leave a comment