अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री दिया मिर्जाचंही नाव समोर आल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी आणि अंकुश यांच्या चौकशीदरम्यान दिया मिर्जाचं नाव समोर आले आहे. एनसीबीजवळ दीया मिर्झाच्या ड्रग्ज खरेदीचे पुरावेही असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळत आहे. मात्र दिया मिर्जानं ट्विटरवरुन सर्व आरोप फेटाळलेत.

आपल्या ट्वीटमध्ये दिया म्हणाली, “माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. सर्व आरोपांचं मी खंडन करते.अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे. शिवाय इतक्या वर्षांपासूनमेहनतीनं उभं केलेल्या माझ्या करिअरवर याचा परिणाम होतोय.मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही किंवा खरेदी देखील केले नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचं खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार.”

दियाने कुठलीही कारवाई होण्यापुर्वीच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

You might also like
Leave a comment