ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

एकमत ऑनलाईन

सातारा : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज सकाळी सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली. आशालता यांच्यासह काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. यांच्यामार्फत करोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

परिचय:

जन्म :  २ जुलै १९४१ आशालता वाबगावकर यांची कारकिर्द
अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी अनेक नाटक, चित्रपट, संगीत नाट्य आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहे. अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना यांच्या कॉमेडी चित्रपट गुपचुप गुपचुकमधील गोवन आँटीची भूमिका असो वा अंकुश चित्रपटातील इतनी शक्ति हमें दे ना दाता. ही त्यांच्यावर चित्रीत केलेली प्रार्थना प्रत्येक भूमिका त्या जगल्या. त्यांनी आश्चर्य नंबर १० (१९७१), गरुड झेप (१९७३), गुड बाय डॉक्टर (१९७६), गुंतता हृदय हे (१९७४), गोष्ट जन्मांतरीची (१९७८), छिन्न (१९७९), देखणी बायको दुसऱ्याची (१९९२), मत्स्यगंधा (१९६४), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२), विदूषक (१९७३) या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिन्ही सांजा (२००९), पकडापकडी (२०११), मणी मंगळसूत्र (२०१०), लेक लाडकी (२०१०), वन रूम किचन (२०११) ही त्यांची आताच्या काळातील काही चित्रपटे. त्यांनी संगीत नाटकांमध्ये नाट्यगीतेही गायली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*