दीपिका, सारा, रकुल, श्रद्धा कपूरला समन्स

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात बॉलिवूडच्या अडचणी वाढत असून सिनेतारकांचे व्यवस्थापन करणारी एजन्सी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) रडारवर आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये ड्रग्जची पाळेमुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा एनसीबीकडून तपास सुरू आहे. या तपासातून ब-याच गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना समन्स बजावले आहे. दीपिकाची मॅनेजर करिष्मा, डिझायनर सिमोन खंबाटा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. हा बॉलिवूडसाठी एक मोठा धक्का आहे.

श्रुती मोदी, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रित सिंह यांना २४ सप्टेंबरला म्हणजे उद्याच चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. दीपिका पदुकोणला २५ सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना २६ सप्टेंबरला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा अमली पदार्थांशी संंबंध समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने काही दलालांची धरपकड केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही बड्या तारकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

एनसीबीतील सूत्रांनुसार जया साह नावाची महिला रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ पोहोचवत होती, असे दोघींमधील चॅटमधून समोर आले आहे. संबंधित एजन्सी अनेक बड्या सिनेतारकांसह दीपिका पदुकोणचेही व्यवस्थापन करते. दीपिका सातत्याने जया व अन्य महिलांशी अमली पदार्थांसंबंधी संपर्कात होती, असा एनसीबीचा संशय आहे. त्यामुळे पूर्ण माहिती घेऊन दीपिकालादेखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

जया साहा, श्रुती मोदीलाही समन्स
जयाचा सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणा-या या एजन्सीशी संबंध आहे. यामुळेच जयाला एनसीबीने समन्स बजावले आहे. त्याखेरीज त्या एजन्सीच्या सीईओंनादेखील बुधवारी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. जयासह सुशांतसिंहची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी हिलादेखील समन्स बजावण्यात आले आहे.

श्रद्धासाठी मागवले ऑनलाईन सीबीडी ऑईल
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) होणा-या चौकशीत मोठा खुलासा केला असून अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली.श्रद्धा कपूरशिवाय सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईल मागवल्याचा खुलासा जयाने केला.

पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; कॉग्रेस पक्षाची मागणी

You might also like
Leave a comment