नेटफ्लिक्सशी 100 कोटींची डील; शाहीद कपूरचा ओटीटीवर डेब्यू

मुंबई : एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार शाहीद कपूर लवकरच एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने शाहीद कपूरसोबत 100 कोटींची डील फायनल केली असल्याची माहिती समोर येत आहे.

नेटफ्लिक्ससोबत केलेल्या या टाय अपसह शाहीद नेटफ्लिक्सच्या अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसू शकतो. शाहीदने आतापर्यंत याबाबत काही माहिती दिलेली नाही. पण या डीलबद्दल शाहीदने फायनल केले असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाकाळात अनेक बड्या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. अमिताभपासून अभिषेक बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले आहेत. आता शाहीदही या दिशेन आपले पाऊल टाकत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर सध्या आपल्या नवीन ‘जर्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ‘कबीर सिंह’ चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीद कपूरचे स्टार झळकले आहेत. त्यानंतर त्याला आता अनेक बड्या चित्रपटाच्या ऑफर येत आहेत. बॉलिवूडशी संबंधित प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास ईच्छुक आहे. कबीर सिंह चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीदच्या फीमध्येही मोठी वाढ झाली असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान, शाहीदचा नवीन चित्रपट जर्सीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जर्सी चित्रपटात शाहीद एका क्रिकेटरची भूमिका निभावत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

You might also like
Leave a comment