पावसामुळे रियाच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द; २९ सप्टेंबरला सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर प्राथमिक सुनावणी होणार होती. मात्र, कालपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज उच्च न्यायालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज ही सुनावणी रद्द करण्यात आली आता पुढील सुनावणी उद्या होणार आहे.

रियाचे वकील सतीश माने शिंदे म्हणाले की, शहरात पडत असलेल्या पावसामुळे सर्व भागात पाणी साचले आहे. त्यामुळे शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आज कोर्टासाठी सुट्टी जाहीर केली असून या प्रकरणीची सुनावणी आता उद्या होणार आहे. सुशांतसिंहचे मदतनीस दीपेश सावंत व सॅम्युअल मिरांडा आणि अमली पदार्थांचा कथित विक्रेता अब्देल बसित परिहार यांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जांवरील सुनावणी न्या. सारंग कोतवाल यांनी २९ सप्टेंबरला ठेवली आहे. त्यामुळे रिया व शौविकच्या अर्जांवरही त्याच दिवशी सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमली पदार्थांच्या विक्रीचा आरोप असलेला कथित विक्रेता झैद विलात्रा याच्या जामीन अर्जावर सोमवारी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी एनसीबीने उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितल्याने न्यायमूर्तींनी त्यावर पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी ठेवली.

दरम्यान, रियाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी मुंबई विशेष न्यायालयाने रियाच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

कोव्हिड १९ अंतर्गतच्या कामातून शिक्षकांना वगळावे -अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघटनेची मागणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*