प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं

चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दवाखाण्यातील डाॅक्टरांनी काढलेल्या परिपत्रकात त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आहे.

बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची बाधा झाली होती. 2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी डाॅक्टरांची विशेष टीम त्यांंच्यावर लक्ष ठेऊन होती. मात्र काही तासांपुर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं आहे.

एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: गेल्या महिन्यात फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या मित्रांना फोन न करण्याची विनंती केली होती. याशिवाय दोन-चार दिवसात डिस्चार्ज मिळेल, असंदेखील ते म्हणाले होते.

You might also like
Leave a comment