भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड

मुंबई : सुप्रसिध्द डायरेक्टर शेखर कपूर यांची पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

शेखर कपूर हे अभिनेता, निर्माता आणि डायरेक्टर आहेत. हिंदी सिनेमा आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं आहे. मिस्टर इंडिया आणि मासूम सारखे सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. एलिजाथेथ या सिनेमासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन देखील प्राप्त झालं होतं. बॅन्डेट क्वीन देखील सिनेमा त्यांच्या नावावर असून त्या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. आज त्यांनी FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

You might also like
Leave a comment