शक्तीकपूर एनसीबी अधिकारी आणि सुधा चंद्रन सीबीआय अधिकारी साकारणार

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने एनसीबीने शनिवारी (26 सप्टेंबर) अभिनेत्री श्रद्धा कपूरची चौकशी केली. क्वान कंपनीची कर्मचारी जया साहाने एनसीबी चौकशी दरम्यान, मी श्रद्धा कपूरसाठी ‘सीबीडी ऑईल’ मागवायचे, अशी कबुली दिली होती. यामुळेच श्रद्धाला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. एकीकडे श्रद्धा कपूरचे नाव ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकले आहे. तर दुसरीकडे, श्रद्धाचे वडील अभिनेता शक्ती कपूर सुशांतवर बनत असलेल्या चित्रपटात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेतसुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर, त्याच्या जीवन कथेवर आधारित ‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. याच चित्रपटात शक्ती कपूर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे सुशांत प्रकरणात त्याची माजी मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक साराओगी यांची पत्नी सरला साराओगी या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटासंदर्भात बोलताना अभिनेता जुबेर खानने इतर कलाकारांविषयीदेखील माहिती दिली. या चित्रपटात अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शक्ती कपूर एनसीबी अधिकारी आणि अभिनेत्री सुधा चंद्रन सीबीआय अधिकारी साकारणार आहेत.

जुबेर खान या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतशी साधर्म्य असणारे, ‘महेंद्र सिंह’ मुख्य पात्र साकारत आहे. तर, अभिनेत्री श्रेया शुक्ला साकारत असलेली ‘उर्वशी’ही रिया चक्रवर्तीशी मिळतीजुळती आहे. याचबरोबर सारा अली खान, अंकिता लोखंडे, कृति सेनॉन, श्रुती मोदी आणि दिशा सालियन यांच्यावर आधारित पात्रांसाठीदेखील अभिनेत्रींची निवड करण्यात आल्याचे जुबेरने सांगितले.

‘बिग बॉस’ फेम सोमी खान दिशा सालियनचे पात्र साकारणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू झालेला तपास आता बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनपर्यंत आला आहे. चित्रपटातदेखील या सगळ्या गोष्टींवर भाष्य केले जाणार आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भातील सगळे अँगल यात दाखवले जातील. यात हत्येचा संशय आणि आत्महत्येच्या अँगलचा देखील समावेश असणार आहे. चित्रपटात पाच गाण्यांचादेखील समावेश आहे. दिलीप गुलाटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. तर, डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे जुबेर खानने सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*