‘सत्यमेव जयते 2’ चे पोस्टर प्रदर्शित; पोस्टरवर टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता देशभरातील सर्वच सेवा सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडमधील विविध चित्रपटांचं चित्रीकरण सुरू झाले आहे. अभिनेता जॉन अब्राहमच्यासत्यमेव जयतेया चित्रपटाच्या यशानंतर आता आता सत्यमेव जयते 2 देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच जॉन अब्राहमने त्याच्या या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हा चित्रपट 12 मे 2021 ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाफ झवेरी यांनी लखनऊमध्ये शूटिंग सुरु केलं आहे. सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागात जॉन भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसला होता. पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरुद्ध जॉन अब्राहमने त्या चित्रपटात आवाज उठवला होता. आता दुसऱ्या भागात तो राजकीय नेते, उद्योगपतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसेल.मात्र जॉनने हे पोस्टर शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. जॉनच्या या सिनेमाच्या पोस्टरवर असे लिहण्यात आले आहे की, ‘जिस देश की मैया गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है’. नेटकऱ्यांनी या पोस्टरवर टीका केली आहे.

या पोस्टरवर जॉनच्या अंगातून रक्त येताना दाखवलं आहे आणि रक्ताच्या जागी तिरंग्याचे रंग दाखवले आहेत. त्यात भगवा रंग खाली आणि हिरवा रंग वर दाखवल्यामुळे नेटकरी भडकले आहेत. त्यामुळे त्यांनी जॉन अब्राहमला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरूवात केली आहे. आपल्या तिरंग्यामध्ये भगवा रंग सर्वात वर आहे आणि हिरवा रंग सर्वांत खाली आहे. ही चूक लवकरात लवकर सुधारण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*