‘ब्लॅक पँथर’च्या शेवटच्या ट्विटने रचला विक्रम

सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’ फेम अभिनेता चॅडविक बोसमन याचं निधन झालं आहे. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगामुळे त्रस्त होता. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान त्याच्या ट्विटर हँडलवरुन केलेले शेवटचे ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणारे ट्विट ठरले आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली. चॅडविकच्या या ट्विटला आतापर्यंत ६७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. २३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जगभरातील लाखो चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

चॅडविक बोसमन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होता. ‘किंग ऑफ वकांडा : ब्लॅक पँथर’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.