यंदाचा ‘इफ्फी’ नोव्हेंबरऐवजी जानेवारीमध्ये

भारताच्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोवा येथे दि. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार होता.

मात्र कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर हा चित्रपट महोत्सव आता पुढील वर्षी दिनांक 16 ते 24 जानेवारी या काळामध्ये भरविण्यात येणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेवून या महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला आहे.

अलिकडच्या काळामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांप्रमाणे कोविड-19 संबंधित सर्व नियम यावेळी काटेकोरपणे लागू करण्यात येणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*