अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.


हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या दिवाळीला तुमच्या घरी लक्ष्मीसोबतच धमाकेदार बॉम्बसुद्धा येईल, असे म्हणत अक्षयने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

नुकतंच सोशल मीडियावर अक्षयने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा एक टिझर शेअर केला आहे. लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेविषयी फॅन्सला फार उत्सुकता आहे.

अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारत आहे. त्यामुळे अक्षयच्या लूकचीसुद्धा खूप चर्चा झाली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.