शाहरुखच्या चित्रपटात सलमानची एण्ट्री | बादशाह शाहरुख खानचा नवा चित्रपट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पठाण’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुखसोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील झळकणार आहे. परिणामी या दोन सुपरस्टार्सला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘पठाण’ हा एक अ‍ॅक्शन थ्रीलर पठडीतील चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान देखील झळकणार आहे.

सलमान या चित्रपटात एक लहानसा कॅमियो सीन देणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. सिद्धार्थ आनंद याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे.

शाहरुखसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार याबाबत कुठलीही माहिती अद्याप जाहीर केली नाही. येत्या काळात शाहरुख या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहे.

You might also like
Leave a comment