डासांमुळे जगभरात दरवर्षी 10 लाख मृत्यू!

जगभरातील मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण डास आहेत. दरवर्षी सुमारे 10 लाख लोक डासांमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमुखी पडतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मलेरिया अहवाल 2017 नुसार, दक्षिण पूर्व आशियात सर्वात जास्त 87 टक्के मलेरियाचे रुग्ण आढळले. 2015 मध्ये जगभरात मलेरियामुळे 4.38 लाख लोक मरण पावले आहेत. गेल्या 30 वर्षांत डेंग्यूच्या संसर्गामध्ये 30 पट वाढ झाली आहे.

डासांच्या सर्वात धोकादायक प्रजाती

ॲनोफ्लीज

भारतात याच्या 58 प्रजाती आढळतात. यापैकी 5 धोकादायक मलेरियाच्या वाहक आहेत.

एडीज

हे डास जगभर आढळतात. हे डेंग्यू आणि चिकन गुनिया हे आजार पसरवतात. ते मुख्यतः दिवसा चावतात.

क्युलेक्स

भारतात याच्या 240 प्रजाती आढळतात. हे डास मुख्यतः रात्री चावतात.

मॅनसाेनिया

हा गट प्रामुख्याने उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो. भारतात दक्षिण भारताच्या किनारपट्टी भागात जास्त आढळतात. ते फायलेरिया पसरवतात.

डासांमुळे होणारे 5 प्रमुख आजार

पहिला चिकन गुनिया आहे, या आजाराने ग्रस्त व्यक्तीला तापासोबत तीव्र वेदना होतात. दुसरा मलेरिया आहे, यामुळे जगात दरवर्षी सुमारे साडेचार लाख मृत्यू होतात. त्याचप्रमाणे डेंग्यू, झिका आणि वेस्ट नाइल फीव्हरसारखे आजार डासांद्वारे पसरतात.

You might also like
Leave a comment