मातृत्वानंतरचं नैराश्य!

मातृत्व हि स्त्रीला लाभलेली एक देणगी आहे. मातृत्व हि एक घटना आयुष्यात मोठा बदल आणते आणि हि प्रक्रिया मानसिकरित्या अनेकींना थकवून टाकते. नव्याने अंगावर पडलेली बाळाची जबाबदारी, बदललेले दैनंदिन आयुष्य, अपुरी झोप, आर्थिक ओढाताण अशा अनेक कारणांमुळे महिलांमध्ये मातृत्वानंतर नैराश्याची लक्षणे दिसतात.

लक्षणे

सतत उदास वाटणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी अजिबात न आवडणे, रडायला येणे, सतत मूड खराब होणे, लहान लहान गोष्टींचे वाईट वाटणे ही मातृत्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे आहेत.

कारणे काय? :

  • हार्मोन्समध्ये अचानक होणारे बदल हे यामागचे प्रमुख कारण आहे. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन ही हार्मोन्स महत्त्वाची आहेत.
  • मानसिकदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या महिलेला भावनिक आधार नसणे, सामाजिक- आर्थिक प्रश्न, नवऱ्याचे पुरेसे पाठबळ नसणे, नवरा व्यसनी असणे, मुलगा किंवा मुलगी यांबाबत असलेली ठाम इच्छा पूर्ण न होणे आदी कारणांस्तव नैराश्य येते.
  • भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू यामुळे हा आजार बळावण्याची शक्यता असते.

उपाय

यावर उपाय म्हणजे नवजात मातांकडे कुटुंबातील नवरा, आई-वडील, सासू-सासरे यांनी पुरेसे लक्ष देणे, त्यांना समजून घेणे आणि पाठिंबा देणे गरजेचे असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*