कोरोना आणि म्युकरमायकोसीस एकाचवेळी होऊ शकतो का ? याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात हजारो लोक दररोज मृत्युमुखी पडत आहेत. आता एक नवे संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. काही रुग्णांना म्युकरमायकोसीस या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे.

म्युकरमायकोसीस हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. कोरोना आणि म्युकरमायकोसीसची एकाचवेळी लागण होऊ शकते का ? याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना आणि म्युकरमायकोसीसची एकाचवेळी लागण होऊ शकते. रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर असेल किंवा ज्यांना एडस् आणि डायबेटीस यासारख्या सहव्याधी असतील त्या रुग्णांना कोरोना आणि म्युकरमायकोसीस एकाचवेळी होऊ शकतो.

मात्र, सध्या भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसीसची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. केवळ योग्य वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

म्युकरमायकोसीसची लक्षणे कोणती ?

  • ताप
  • सर्दी
  • नाक सतत वाहणे
  • डोकेदुखी
  • श्वास घेताना त्रास जाणवणे

म्युकरमायकोसीस – हवेत असणाऱ्या काळ्या बुरशीमुळे या आजाराची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा सहव्याधी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसीसची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

You might also like
Leave a comment