सुर्य नमस्कारा दरम्यान या चुका टाळा
सुर्य नमस्काराने शरिराच्या सर्व भागाचा व्यायाम होतो. यामध्ये एकूण १२ आसने आहेत. ज्याचा शरिराच्या वेगवेळ्या भागावर प्रभाव पडतो. परंतु याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने करता. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.
- जर सुर्य नमस्कार पहिल्या वेळेस करत असाल, तर शरिराला गरम करणे अर्थात वार्मअप करणे गरजेचे आहे.
- सुर्य नमस्कारापेक्षा आसन किती वेळा केले त्यावरच जास्त लक्ष केंद्रित करत बसू नका.
- कुठलेही आसन घाईघाईत न करता पुरेसा वेळ देऊन 12 आसने पूर्ण करा.
- सर्व आसने एकाच वेळी करण्याची घाई करू नका. सुर्य नमस्कार करताना मध्ये थांबले तर काहीच नुकसान होत नाही.
- सुर्य नमस्कारात 12 आसने असतात प्रत्येक आसन हे महत्वपूर्ण आहे, त्यामुळे आसनातील प्रत्येक मुद्रा ही योग्य पद्धतीने करा.
- बरेच लोक 12 आसने करताना श्वासांवर लक्ष केंद्रित करत नाही. ज्यामुळे तुम्हाला सुर्य नमस्काराचा योग्य लाभ मिळत नाही.