डेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय

कोरोनाचा कहर असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका घोंगाऊ लागला आहे. अनेक डॉक्टर याबाबत वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची पहिली केस भारतात सापडली.

त्यानंतर ८५ देशात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत अनेक केसेस सापडले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी काही उपाय तज्ज्ञांनी सांगितले आहेत.

कोणती लस जास्त प्रभावी

सुरुवातीला कोविडची लस अल्फा व्हेरिएंटनुसार विकसित केली गेली होती. त्यामुळे शक्यता आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंट या अँटीबॉडीजना आरामात टक्कर देऊ शकतो.

काही तज्ज्ञांच्या मते, लसीचा नव्या डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी नाही काहींच्या मते ही लस धोका टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन शिवाय स्फुटनिक लसही चांगली मानली जात आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कोणाला धोका अधिक?

युकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वाधिक घातक आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार कमी वयाच्या व्यक्ती, वॅक्सिन न घेतलेले आणि केवळ एकच वॅक्सिन घेतलेले लोक याला पटकन बळी पडू शकतात.

लक्षणे काय?

खोकला, ताप, डोकेदुखी, त्वचेवर लालसर चट्टे, बोटांचे बदलेले रंग याचबरोबर छातीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास ही लक्षणेही दिसतात. काही जणांच्या बाततीत पोटदुखी, कमी भूक लागणे ही लक्षणे देखील दिसतात.

कशी घ्याल काळजी?

  • WHO नुसार मास्क वापरणे आणि लस घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
  • हात सतत साबणाने अथवा हँडवॉशने धुवत राहा
  • सॅनिटाईझरचा वापर करा, मास्क वापरा
  • इतर वस्तूंना हात लावताना काळजी घ्या
  • शिंकताना टिश्युने पूर्ण नाक झाका. त्या टिशूला योग्य ठिकाणी टाका.
  • धुम्रपान करू नका
  • कारण नसताना घरातून बाहेर निघू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*