दिवाळीचा फराळ आणि आहार!

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. अशात फराळाची चाहूल सुरु होते. दरम्यान तेलकट खाद्य पदार्थ खाण्याचा मोह आपल्याला आवरल्याशिवाय राहत नाही. मात्र हे सारे फराळाचे जिन्नस खाताना काही पथ्ये पाळली तर त्यांचा आपल्या शरीराला आणि आरोग्याला कसलाही उपद्रव होत नाही.

आपल्याकडे दिवाळीचे खाद्य पदार्थ म्हणजे तेला-तुपाचा भडिमार आणि साखरेची रेलचेल आलीच. त्यात काजू, बदाम, पिस्ता, हरभर्‍याची दाळ अशा सगळ्या वातूळ पदार्थांची उपस्थिती असतेच.

आपण मात्र हे सगळे खाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, शक्यतो घरी तयार केलेलेच खाद्यपदार्थ खायला हवे. कारण बाजारातून फराळाच्या जिनसा आणू नयेत आणि नाईलाजाने तशा आणाव्याच लागल्या तरी त्या लहान मुलांनी खाव्यात. वयस्कर लोकांनी त्यापासून दूर रहावे.

असे करण्यामागचे कारण म्हणजे, हलवायाच्या दुकानातून आणलेल्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते आणि मुळातच मधुमेहाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या भारतासारख्या देशात ही अतिरिक्त साखर पचत नाही.

घरात सुद्धा गोड पदार्थ तयार करताना साखरच वापरावी. साखरेला पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम पदार्थ मिठाईत वापरू नयेत.

दिवाळीमध्ये परस्परांना भेट देताना मिठाईचे बॉक्स देण्याऐवजी पुस्तके देऊ शकता. मिठाई द्यायची वेळ आलीच तर शक्यतो गोड पदार्थ त्यात कमी असावेत. फळे आणि सुका मेवा देखील देऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*