मश्रुमचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

मश्रुम बऱ्याच लोकांना आवडतं आणि बऱ्याच लोकांना त्याचा वास सुद्धा नको वाटतो. मश्रुम सूप्स, भाजी आणि इतरही अनेक पदार्थ आजकाल सहज बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांना आवडत नाही त्यांनी सुद्धा मश्रुम खायला हवे! का? जाणून घ्या कारणं…

  • हे ब्लड प्रेशर सारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
  • कार्बोहाइड्रेटची पर्याप्त मात्रा असल्यामुळे हे कब्ज, अपचन, अती अम्लीयतासमेत पोटाच्या विभिन्न विकारांना दूर करतो.
  • मधुमेहाच्या रुग्णांना जे काही हवे असते ते सर्व मश्रुममध्ये उपस्थित आहे. यात व्हिटॅमिन, मिनरल आणि फायबर असतं. हे शरीरात इन्सुलिन निर्माण करतं.
  • यात लीन प्रोटीन समाविष्ट आहे, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं.
  • यात सोडियम सॉल्ट देखील नसतो, त्यामुळे लठ्ठपणा, किडनी व हृदयघात रुग्णांसाठी हा आदर्श आहार आहे.
  • मश्रुममध्ये लोह घटक तसे तर कमी प्रमाणात असतात, पण रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कायम राखायला मदत करतात. यात बहुमूल्य फॉलिक ऍसिडची उपलब्धता असते, जी फक्त मांसाहारी खाद्य पदार्थांपासून प्राप्त होते.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*