लहान मुलांमधील लठ्ठपणाची कारणं काय?
गुटगुटीत बाळ कोणाला आवडत नाही? परंतु, हाच गुटगुटीतपणा लठ्ठपणामध्ये परावर्तित होतो तेव्हा हि काळजीची बाब बनते.
काय असतात कारणं लहान मुलांमधील लठ्ठपणाची? जाणून घेऊ:
अनुवंशिकता
अनेकदा मुलाचा लठ्ठपणा हा पालकांच्या आनुवंशिकतेचा भाग असतो. पालकांपैकी एक जण जरी लठ्ठ असेल तर मुलामध्ये त्याची लक्षणं दिसून येतात.
बदलती जीवनशैली
मुलांची जीवनशैली हि आपल्याप्रमाणेच बदलत आहे. मैदानी खेळ बाजूला पडून मोबाईल आणि व्हिडीओ गेम्स ने त्याची जागा घेतली आहे. यामुळे शारीरिक हालचालींवर बंधनं येऊन मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे.
कारणे काहीही असली तर त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या खूप गंभीर रूप धारण करतात. जसं कि, पीसीओडी, नैराश्य, वंध्यत्व, उच्च रक्तदाब, झोप न येणे, इत्यादी समस्या शारीरिक आणि मानसिक हानी करतात.
लहान मुलांमधील लठ्ठपणावर उपाय
मुलांकडून व्यायाम, योगासने करून घेणे, त्याच्या आहारावर नियंत्रण ठेवणे, त्यांचा बैठ्या कामातील वेळ कमी करून, मैदानी खेळांतील रुची वाढवणे, चपळ जीवनशैली स्वीकारणे, त्यांच्या सवयी बदलणे हे बालवयातील लठ्ठपणावर परिणामकारक उपाय आहेत .