जाणून घ्या रक्तशुद्धीसाठी उपाय

रक्ताभिसरण आणि त्यासंबंधित समस्यांचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. रक्तातील अशुद्ध तत्व आणि त्यामुळे वाढणारे आजार हे बदलत्या जीवनशैलीमुळे होत आहेत. जीवनशैलीतील परिणामकारक बदल तुम्हाला रक्तशुद्धी करण्यास मदत करतील. काही पदार्थांच्या आहारातील समावेशाने रक्तशुद्धी होऊ शकते ते जाणून घेऊ:

ब्लू बेरिज

ब्लू बेरिजमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतात. ब्लू बेरी लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ब्लू बेरीजचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्ही हे दही, दलिया या स्मूदीमध्ये एकत्र करू शकता.

क्रेनबेरी

क्रेनबेरी (यूटीआयवर) स्त्रियांच्या मूत्रमार्गातील संसर्गावर अत्यंत फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्व मूत्रमार्गातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि किडनीचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. क्रेनबेरीचा आहारात समावेश करण्यासाठी दलिया, स्मूदी किंवा सलाडच्या रूपात करू शकता.

लसूण

जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये जेवण तयार करण्यासाठी लसूणाचा वापर करण्यात येतो. पण लसूण शिजवून खाल्यावर जेवढा फायदा होत नाही, जेवढा तो कच्चा खाल्यावर होतो. त्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये थोडासा कच्चा लसूण एकत्र करा.

Disclaimer आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*