‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ची धूम सुरु

नोव्हेंबर महिना सुरु झाला हि ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ चा ट्रेंड जोर धरतो. मागील काही वर्षांपासून सात्यत्याने या संकल्पनेची क्रेझ वाढत आहे. पण हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून ती एक सामाजिक मोहीम आहे.

नो शेव्ह नोव्हेंबर सुरुवात

कॅन्सरच्या रुग्णांसाठी ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन 1999 साली ही मोहीम सुरू केली.

नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेचा हेतू काय?

कॅन्सरग्रस्तांवर उपचारांदरम्यान केस गळण्याचे प्रमाण अधिक असते. अशात चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी खर्च होणारे पैसे महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सरसंदर्भातील मोहिमेला दान करायचे.

दाढी ठेवण्याचे असेही फायदे

  • दाढी असल्यावर कुठल्याही प्रकारचे विषाणू शरीरात जात नसल्यामुळे घशाचे विकार होत नाहीत.
  • प्रदुषित हवा नाकावाटे फुफ्फुसात जात नसल्यामुळे अस्थमा रुग्णांसाठी याचा विशेष फायदा आहे.
  • दाढी मिशामुळे सुर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते.
  • दाढी ठेवल्यामुळे संसर्गापासून त्वचेचे रक्षण होते व अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता कमी होते.
  • विशेषतः दाढी मिशी ठेवल्याने पुरुषाचे व्यक्तीमत्व अधिक रुबाबदार दिसते.
Leave a comment