या रेस्टॉरंटमध्ये टकलूंना मिळतात खास सवलती

टक्कल पडणे हे पुरूषांच्या दृष्टीने चांगले लक्षण मानले जात नाही. मात्र जपानमधील एका रेस्टॉरंटने खास टक्कलवाल्यांना म्हणून काही सवलती दिल्या आहेत.

मालकिणीच्या मते या लोकांना एकटे वाटू नये तसेच टकलूही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे त्यांना वाटावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या सवलती दिल्या जात आहेत.

रेस्टॉरंटची मालकीण योशिको टोयोडा सांगते, जपानमध्ये टक्कल हा अतिशय संवेदशनशील मुद्दा आहे. पुरूष टक्कल पडायला लागले की नर्व्हस होतात, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना अनेकदा निराशा येते असा अनुभव आहे.

आम्ही त्यांचा आत्मविश्वास परत मिळावा म्हणून त्यांच्या खाण्यापिण्यावर खास सवलत देतो. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्यासारखेच आणखी टकलू मित्रसोबत आणले तर जास्त डिस्काऊंट देतो.

डिस्काऊंट मिळत असल्याने टकलूंच्या चेहर्‍यावर आनंद दिसतो आणि आमचाही व्यवसाय चांगला होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.