जबरदस्त फीचर्सह Vivo Y12G बजेट स्मार्टफोन भारतात लाँच

विवो स्मार्टफोन कंपनीने नवा स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच केला आहे.

हा बजेट स्मार्टफोन फक्त एकाच वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 3जीबी रॅम+32जीबी इंटरनल स्टोरेज. तसंच Glacier Blue आणि Phantom Black या दोन रंगांत उपलब्ध आहे.

या मोबाईलमधील आकर्षणाची गोष्ट म्हणजे ड्युएल रिअर कॅमेरा, वॉटरड्रॉप स्टाईल डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 439 Soc प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी हे आहे.

विवो वाय 12 जी हा फोन सध्या कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांकडेच उपलब्ध आहे. मात्र लवकरच हा फोन ऑनलाईन बाजारातदेखील विक्रीस उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Vivo Y12s या मागील वर्षी लाँच झालेल्या स्मार्टफोनसोबत हा फोन बराच मिळताजुळता आहे. तसंच यांची किंमतही सारखीच आहे.

9,990 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे. Galaxy M12, Redmi 9 Power आणि the Poco M2 ला हा फोन टक्कर देणार आहे.

Vivo Y12G मध्ये 6.51 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन सह देण्यात आला आहे. 20:9 असा आस्पेट रेशो आहे.

यात octa-core Qualcomm Snapdragon प्रोसेसर असून 3 जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. तसंच गेमर्ससाठी Multi Turbo 3.0 देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी यात ड्युएल कॅमेरा देण्यात आला आहे. 13MP चा प्रायमरी सेन्सर कॅमेरा f/2.2 लेन्स आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर f/2.4 लेन्स सह देण्यात आला आहे.

हा अँड्रॉईड 11 वर आधारित Funtouch OS 11 वर कार्यरत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 10W चार्जींगसह देण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*