जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

कोरोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे.

सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.

आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे.

सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं.

मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.

आशिया पॅसिफिकमध्ये कोरोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

कोरोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*