जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी आली आहे. गेले काही दिवस रखडलेला अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहे.

बायडन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या 270 मतांपेक्षा जास्त 290 मते बायडन यांना मिळाली आहेत. 1972 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी बायडन पहिल्यांदा सीनेटर झाले होते.

अमेरिकन आणि युरोपीय माध्यमांनी जो बायडन जिंकल्याचं जाहीर केलं आहे.

तर बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन हे उपाध्यक्ष होते. अखेर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून जो बायडन हे अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष झाले आहेत.

Leave a comment