फडणवीस, राऊत यांना गावबंदी, विदर्भवादी आक्रमक

स्वतंत्र विदर्भासाठी आक्रमक झालेल्या विदर्भवाद्यांनी सोमवारी नव्या संघर्षाचा इशारा दिला. विदर्भाच्या नावावर मते मागून सत्तेत आलेले भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोरोना काळात भरमसाठ वीज बिल लादणारे राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही वैदर्भीयांची फसवणूकच केल्याचा नारा देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने रविवारी अन्नत्याग केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात नेत्यांना गावबंदीचा निर्णय जाहिर केला.

समितीचे संयोजक राम नेलवे यांनी या बाबत ठराव मांडला. सर्वांनी त्याला सहमती दर्शवत आंदोलन तिवृ करण्याचा इशारा दिला. यावेळी अॅड. वामनराव चटप, रंजना मामर्डे, कर्नल चरडे, देविदास लांजेवार, मधुसूदन हरणे, सुदाम राठोड, सुयोग निलदावासर, प्रशांत तागडे, राज ठाकूर, युवराज उपरते, चेतन उमाठे, अजय कडू, राजेंद्र सताई आदी उपस्थित होते.

26 ऑगस्टला रास्तारोको

दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला 26 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. यादिवशी संपूर्ण विदर्भात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन केले जाणार आहे.

त्यानंतर 21 नोव्हेंबरपासून पूर्व व पश्चिम विदर्भात ‘विदर्भ निर्माण जनजागृती यात्रा’ काढली जाणार आहे. डिसेंबर मध्ये राजधानी नवी दिल्लीत लोकसभा अधिवेशन काळात विदर्भ मार्चा नेला जाणार असल्याचाही यावेळी निर्धार विदर्भवाद्यांनी केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*