खुशखबर! आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार | MSRTC Bus Location

ST नेमकी कुठे पोहोचली, कुठे थांबली आहे, याची त्याच क्षणी माहिती मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये ‘VTS’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई विभागातील ३४९ गाड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाच आगारांतील बसस्थानकातून डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून लवकरच ते कार्यान्वित होणार आहेत. जेणेकरून प्रवाशांना एसटीचा नेमका ठावठिकाणा लागणार आहे.

रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘VTS’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर प्रवाशांना संबंधित ST कोणत्या भागातून धावत आहे. तिचे शेवटचे लोकेशन काय होते. संबंधित बसस्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे, तसेच सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आहे. डिस्प्लेच्या माध्यमातून कुठली बस कुठल्या मार्गावर धावत असून ती किती वेळेत बसस्थानकात येणार आहे. याची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.

असा होणार यंत्रणेचा लाभ

एसटी बसस्थानकात उशिरा येण्यामागची कारणे अनेक असतात, त्याचा परिणाम अन्य बस फेर्‍यांवर होत असतो. STचे वेळापत्रक सुधारावे व बसची सद्यःस्थिती प्रवाशांना कळावी यासाठी ‘VTS’ प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अपघात झाल्यास तत्काळ अपघातस्थळी मदत पोहोचविता यावी यासाठीही या यंत्रणेचा लाभ होणार आहे.

एसटीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना एस.टी.नेमकी कुठे आहे, याची माहिती कळावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे ‘VTS’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकात याबाबत डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून तांत्रिक बाबींची पूर्तता सुरू असून लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बस स्थानकात लागले माहितीपर मोठे स्क्रीन

विभागातील पाच आगारांतील बसस्थानकातून डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. बस सुटण्याची व पोहोचण्याची वेळ निश्‍चित असते. ती वेळ प्रवाशांना डिस्प्लेच्या माध्यमातून समजणार आहे. बसचा अपघात झाला तर त्याचीही माहिती ‘VTS’मुळे तातडीने कळणार असल्याने आवश्यक ती मदत अपघातस्थळी पोहोचविणे शक्‍य होणार आहे.

एखाद्या नियोजित किंवा अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहिती महामंडळाला कळणार असून त्यामुळे संबंधित चालक किंवा वाहकावर कारवाई करणे शक्य होणार आहे. बस सध्या कुठल्या मार्गावर घावत आहे. तेथून बसस्थानकात यायला किती अवधी आहे. मात्र उशीर झाला तर याची माहिती प्रवाशांना मिळणार असून चालक वेळकाढुपणा करीत असेल तर कारवाई करता येणार आहे.

Leave a comment