विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची निवड

महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदी पुन्हा शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्‍हे यांची निवड झाली आहे.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे.

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याला जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात नीलम गोर्‍हे यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान भाजपाने सभात्याग केल्याने महाविकास आघाडीसाठी मार्ग मोकळा झाला आणि बिनविरोध नीलम गोर्‍हे विधानपरिषद उपसभापती झाल्या.

मागील वर्षी जून महिन्यात पहिल्यांदा नीलम गोर्‍हे यांना पहिल्यांदा उपसभापती पद दिले होते. आता पुन्हा त्यांना ही संधी देण्यात आली आहेत.

You might also like
Leave a comment