कोण आहेत आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा?

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यांच्यासोबत १३ कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली.

कोण आहेत हेमंत बिस्वा शर्मा?

हेमंत बिस्वा शर्मा यांनी २०१५ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.

माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी मतभेदामुळे काँग्रेसमधून बाहेर.

सर्व पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश.

२०१६ च्या विधानसभा निकालानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत होतं. मात्र सर्बानंद सोनोवाल यांची निवड

शर्मा यांनी सीएए आणि करोना स्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

हेमंत बिस्वा शर्मा यांनी दुसऱ्यांदा भाजपाला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आसामच्या बागपत जिल्ह्यातील जालुकबारी विधानसभेतून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत.

Leave a comment