केंद्र सरकारकडून तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

कोरोनाविरुद्ध लढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरतेय आहे असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल. त्याचबरोबर बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के वाढ झाली. तर आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

कोरोनानंतर भारताचा रिकव्हरी पाहून मूडीजने आपला अंदाज बदलला. यापूर्वी मूडीजने यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी उणे 9.6 टक्के राहील असं सांगितलं होतं. आता बदल करून तो यंदाच्या वर्षात उणे 8.9 टक्के राहील असं सांगितलं आहे.

पुढील आर्थिक वर्षासाठी यापूर्वी मुडीजने 8.1 विकासदर अंदाज वर्तवला होता. तो आता बदल करून 8.6 टक्के असा सांगितला आहे.

निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  • भारतीय अर्थव्यवस्थाला मजबूत करण्यासाठी मागील पाऊले महत्वाचे ठरले आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थाला ताकद मिळाली आहे.
  • 12 टक्के वीजेची खपत 12 टक्के वाढली आहे.
  • रेल्वे मालवाहक ची 20 टक्के वाढ झाली आहे.
  • बँक क्रेडिट मध्ये 5.1 टक्के वाढ झाले आहे.
  • RBIने भारतीय अर्थव्यवस्था चांगला काम करत असल्याचा संकेत दिले आहे.
  • विदेशी मुद्रामध्ये सुधार झाले आहे.
Leave a comment