लसीकरण नोंदणी करताना SMS बाबत सावधगिरीचा इशारा

लस

कोविड-19 लसीकरण नोंदणीसाठीचा एक SMS वापरकर्त्यांच्या अँड्रॉइड फोनमध्ये करून प्रवेश मिळवतो आणि त्यामुळे वापरकर्त्यांची संपर्क यादी धोक्यात येत असल्याचा इशारा सांघिक सायबर सुरक्षा यंत्रणेने दिला आहे.

देशातील कोविड-19 लसीच्या नोंदणीसाठी अ‍ॅपचा पर्याय देणारा एक बनावट SMS सध्या फिरत आहे. सोबत दिलेल्या लिंकमुळे अँड्रॉइड फोनमध्ये हानीकारक अ‍ॅप इन्स्टॉल केले जात आहे.

दरम्यान ते SMS च्या माध्यमातून संबंधित वापरकर्त्यांच्या काँटॅक्ट्स पसरते’ असे ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (CERT) ने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनांमध्ये म्हटले आहे.

ही यंत्रणा म्हणजे सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठीची, तसेच फिशिंग व हॅकिंगसारख्या ऑनलाइन हल्ल्यांविरुद्ध भारतीय सायबर विश्वाचे संरक्षण करण्यासाठीची सांघिक तंत्रज्ञान शाखा आहे.

हे अ‍ॅप अनावश्यक परवानग्याही देते व त्यामुळे हल्लेखोरांना संपर्क यादीसारखा वापरकर्त्यांचा डेटा मिळवण्याचा फायदाही घेता येतो.

बनावट अ‍ॅपचे प्रकार : ‘कोविड19 डॉट एपीके’, ‘व्हॅसी अंडरस्कोअर रेजिस डॉट एपीके’, ‘मायव्हॅक्सिन अंडरस्कोअर व्ही2 डॉट एपीके’, ‘सीओव्ह-रेजिस डॉट एपीके’ आणि ‘व्हीसीसीइन- अ‍ॅप्लाय डॉट एपीके’ हे या बनावट अ‍ॅपचे काही ओळख पटलेले प्रकार आहेत.

देशात करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणी करण्याची एकमेव ‘अधिकृत’ ऑनलाइन लिंक https://cowin.gov.in हे पोर्टल असल्याचे सूचनांमध्ये म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*