या स्पर्धेत जिंकणाऱ्याला केंद्र सरकार देणार ५ लाख रुपयांचे बक्षीस

PM Modi

केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ( SBM) आणि संयुक्त राष्ट्र SDG, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या समर्थनाने इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि AGNIi यांच्या सहयोगानं ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’ सुरू केले आहे आणि त्यात सर्वांना सहभाग घेता येणार आहे.

काय आहे ही स्पर्धा?

सार्वजनिक शौचालयात फ्लश सिस्टिममधून प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते. पाणी वाचवण्यासाठी कल्पक फ्लश सिस्टिम तयार करायची आहे.

स्पर्धेचा मुख्य उद्देश सामाजिक परिणाम, पाणी वाचवणे आणि स्वच्छता हे आहेत. सध्याच्या काळात पाण्याची बचत करणए गरजेचे आहे.

त्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विसरता कामा नये. मुख्य उद्देश ध्यानी ठेऊन कल्पकतेनं फ्लश सिस्टम तयार करायची आहे आणि त्यातून पाणी वाचवण्यासोबतच स्वच्छतेचे महत्त्व राखले गेले पाहिजे.

Grand Water Saving Challenge

बक्षीस रक्कम

  • प्रथम विजेता – ५ लाख
  • उपविजेता – २.५ लाख

अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लीक करा 👉 – https://www.startupindia.gov.in/content/sih/en/ams-application/challenge.html?applicationId=6050cc03e4b03f92cbc8c95e

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याची एंट्री स्टार्टअप इंडिया हबवर जमा केली जाते. DPIIT द्वारे नोंदणीकृत स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. २५ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*