उद्योगपतीही आता बँक सुरू करू शकणार; RBIच्या समितीची सूचना

आगामी काळात देशातील उद्योगपती किंवा मोठ्या संस्था बँकेच्या प्रवर्तक बनू शकतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास उद्योगपतींना बँक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

रिजर्व्ह बँकेने बँक लायसनस्यबाबत सूचना आणि प्रस्ताव देण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या या शिफारसीमुळे उद्योगपतींना बँक सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे.

बँक लायसन्सच्या अर्जावर व्यक्तीगत किंवा गटाच्या पात्रदेबाबतच्या निकषांबाबही समितीने सूचना केल्या आहेत. तसेच प्रवर्तक आणि भागधारक यांच्या भागीदारीबाबतच्या नियमांचाही समितीने आढावा घेतला आहे.

50 हजार कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या वित्तीय संस्थांचे बँकेत रुपांतर करण्याचाही विचार करण्यात येऊ शकतो, असे समितीने म्हटले आहे. मात्र, त्यासाठी 10 वर्षे संस्थेचे काम असणे आवश्यक आहे.

युनिव्हर्सल बँकिंगसाठी नवे बँक लायसन्स आणि किमान प्रारंभिक गुंतवणूक 500 कोटीहून 1000 कोटी करण्यात यावी तसेच लघु आर्थिक बँकांसाठी 200 कोटींची मर्यादा 300 कोटी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.