कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षाची शिक्षा

माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना 1999 सालच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षाच्या कारावासची शिक्षा सुनावली आहे.

दिलीप राय यांच्यासह अन्य दोन व्यक्तींना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी निर्णय दिला.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना दिलीप राय यांनी 1999 साली झारखंडमधील कोळसा खाणीचे परवाने देताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

राय यांच्यासह कोळसा मंत्रालयातील तत्कालिन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जीे आणि नित्यानंद गौतम तसेच कॅस्ट्रॉन टेक्‍नॉलॉजिसचे संचालक महेंद्रकुमार आगरवाल हे या प्रकरणात आरोपी आहेत.

न्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात अशा कलमांखाली दोषी ठरलेले राय हे पहिलेच माजी केंद्रीय मंत्री आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*