देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, तुमचे शहर यात आहे का?

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर केले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे.

स्वच्छ शहर

गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

पाचवे वर्ष

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचे हे पाचवे वर्ष आहे.

इतर शहरांची क्रमवारी

स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ला प्रतिसाद

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ हे २८ दिवसांमध्ये पूर्ण केले होते. स्वच्छता अ‍ॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती.

सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडले.

Leave A Reply

Your email address will not be published.