अहमदाबाद IPLचा नववा संघ होण्याची शक्यता

कोरोनाच्या काळातही IPLला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे BCCIने 2021 मध्ये होणाऱ्या पुढील मोसमासाठी मोर्चेबांधणी सुरू केली.

पुढची IPL स्पर्धा ही एप्रिल-मे या कालावधीत होणार असून यामध्ये एक संघ वाढवण्यात येणार आहे. IPLध्ये सहभागी होणारा नववा संघ अहमदाबादच्या रूपात असण्याची शक्यता आहे. तसेच त्याआधी खेळाडूंचा लिलावही होण्याचे संकेत बीसीसीआयकडून यावेळी देण्यात आले आहेत.

यंदा IPL मोसम 10 नोव्हेंबरला पार पडला. 2021 सालामध्ये एप्रिल ते मे या कालावधीत पुढील IPLचा मोसम खेळवण्यात येणार आहे.

खेळाडूंवर बोली लावण्याआधी योजना आखण्यासाठी कमी अवधी मिळत असल्याचे काही फ्रेंचायझींचे म्हणे आहे.

नववा संघ विकत घेण्यासाठी काही काॅर्पोरेट सेक्टर तयार आहेत. त्यामुळे नवव्या संघासाठी खेळाडूंचा लिलाव होणे अपेक्षित आहे. यासाठी बीसीसीआय धावपळ करताना दिसत आहे.

You might also like
Leave a comment