IPL सुरु होण्याअगोदरच मोठा झटका, हे खेळाडू IPL मधून बाहेर

कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे.

IPLचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. परंतु आयपीएल हंगाम सुरु होण्यापूर्वीच विविध आयपीएल फ्रेंचायजींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कारण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत भाग घेणार नसल्याचं समोर येतंय. काही मीडिया रिपोर्टनुसार इंग्लंड आणि ऑस्ट्र्लियाचे खेळाडू व्यस्त असल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत त्यांना भाग घेता येणं शक्य नाहीय.

खेळाडूंचं व्यस्त वेळापत्रक पाहता, आमच्या खेळाडूंना उर्वरित आयपीएल स्पर्धा खेळणं शक्य नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं मत आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील पुढचे काही महिने व्यक्त आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे मिळून जवळपास 30 खेळाडू खेळू शकत नाही, अशी माहिती समोर येत आहे. एकंदरित आयपीएल फ्रेंचायजींचा याचा मोठा फटका बसणार आहे.

You might also like
Leave a comment