नांदेड जिल्ह्यात उद्यापासून जमावबंदी आदेश लागू

नांदेड जिल्ह्यात शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ४ सप्टेंबर मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत.

यानुसार ५ किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी आहे.

हा आदेश कामावरील पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रमांना विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकांना लागू होणार नाही.

Leave a comment