बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेचा राजद-काँग्रेसला कौल

Bihar Election

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबरला या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत.

विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत. या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

राजद हा यामध्ये सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुसरा सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे

२४३ जागांसाठी बिहारमध्ये शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. १२२ ही मॅजिक फिगर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आहे.

एक्झिट पोलनुसार एकहाती सत्ता कोणत्याही पक्षाला काबीज करता येणार नाही. पण, भाजप-जदयूच्या एनडीए आणि राजद-काँग्रेसच्या महागठबंधनमध्ये चुरशीची लढत होईल.

यामध्ये महागठबंधनचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*