ब्लॅक पँथर’चा जगाला अलविदा

हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ब्लॅक पॅथरचा अभिनेता चॅडवीक बोसमनचे निधन झाले आहे.

कॅन्सरमुळे वयाच्या 43 व्या वर्षी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. चॅडवीक बोसमन गेले 4 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होता.

चॅडवीक बोसमनच्या निधनाची माहिती समजताच हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकजण शोक व्यक्त करत आहे.

चॅडवीकने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या.

मात्र, 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने त्याला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवले.

मार्व्हल युनिव्हर्समधला चाडविक बोसमन हा पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो होता.

त्याच्या ‘ब्लॅक पँथर‘ चित्रपटाला ऑस्कर या मानाच्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.

Leave a comment