हरभरा आणि पालक टिक्की | Chana Dal Palak Tikki Recipe

बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

भाजण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

पूर्ण वेळ : १५ मिनिटे

कोर्स : साईड डिश स्नॅक भारतीय, १६ टिक्की, कॅलरी १२४ किलो

उपकरणे : मिक्सर/ ब्लेंडर, लोखंडी तवा/ पाककला पॅन

साहित्य

दोन पालकाच्या जुड्या, ताजी कोथिंबीर, उपलब्धतेनुसार हिरव्या भाज्या, एक कप रात्रभर भिजवून उकडलेले हरभरे, हिरव्या मिरच्या, आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या, चार चमचे किसलेले आले, चवीनुसार मीठ, दोन चमचे गरम मसाला, दोन चमचे चाट मसाला, दोन चमचे भिजवलेले पोहे, तांदळाची पिठी, नारळाचे तेल.

कृती

चिरलेला पालक ग्राईंडरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आले आणि शिजवलेले हरभरे घालून पुन्हा एकदा दळून घ्या. त्यानंतर मीठ गरम मसाला, चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एका भांड्यामध्ये हे मिश्रण ठेवून दहा ते वीस मिनिटात फ्रीजमध्ये ठेवा. मिश्रण बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे घालून मिश्रण पुन्हा एकजीव करा. या मिश्रणाच्या हातावरती तेल लावून गोल आकारात टिक्की बनवा. या टिक्की पॅनवरती सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर गरम-गरम टिक्की कोथिंबीर सर्व्ह करा.

टीप

हरभऱ्यामध्ये फायबर, लोह, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम असते तर पालकांमध्ये फोलेट असते जे त्यामुळे हा नाष्टा एक पौष्टिक नाश्ता आहे. आवडीनुसार या टिक्कीचा रोल करा किंवा गोलाकारात बनवा. मात्र हा पदार्थ बनवत असताना सेंद्रिय पालकाला प्राधान्य द्या तसेच हरभऱ्याऐवजी राजमा आणि पांढरे चने देखील वापरता येतात.

पोषण तत्वे

कॅलरी : १२४ किलो कॅलरी
कार्बोहायड्रेट : १५.७ ग्रॅम
प्रथिने : ७ ग्रॅम
चरबी : ६.५ ग्रॅम
संतृप्त चरबी : १ ग्रॅम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*